फियानग्रस्तांचा अनोखा निषेध मोर्चा

December 7, 2009 10:31 AM0 commentsViews: 2

7 डिसेंबर फियान वादळात बेपत्ता झालेल्या कोकणातल्या मच्छीमारांचा अजूनही शोध लागलेला नाही. तसंच सरकारने दिलेल्या अत्यल्प मदतीचा निषेध म्हणून रत्नागिरीतल्या मच्छीमारांनी सोमवारी समुद्रात बोटी घेऊन मोर्चा काढला. रत्नागिरीच्या राजीवडा समुद्रात सुमारे 40 बोटी घेऊन काढलेल्या या मोर्चात मच्छीमारांनी काळे झेंडे दाखवत निदर्शनं केली. फियान वादळात नुकसान झालेले बागायतदार आणि शेतकरीही या अनोख्या मोर्चात सहभागी झाले होते. हे सर्व आंदोलक सोमवारी नागपूरला रवाना झाले. मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी घेतला आहे.

close