सलमानच्या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया

July 26, 2015 6:08 PM0 commentsViews:

asrgljaewghby

26 जुलै : बॉलीवूडचा दबंग सलमानने रविवारी पहाटे अडीचच्या सुमाराला याकूब मेमनच्या समर्थनार्थ 14 ट्विट केले आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्याच्या या ट्विटचा विरोध करत सातार्‍यात शिवसैनिकांनी सलमानच्या पोस्टरला काळं फासलं. तसंच बजरंगी भाईजान या सिनेमाचा शो बंद पाडला. त्याच्या या ट्विटवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

  • सलमान खानच्या ट्विटला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्याकडे दुर्लक्ष करावे. याकूब मेनन संदर्भात सलमान खानचे ट्विट अर्थहीन व हास्यास्पदच – सलीम खान, सलमानचे वडील
  • याकूब मेमनला आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे. त्यामुळेच या निकालावर जर सलमान खानने मतप्रदर्शन केलं असेल तर तो न्यायालयाचा अवमान ठरतो. सलमानचे खूप फोलोअर्स असून, तो एक चांगला अभिनेता आहे. त्याने वेळेत आपले ट्विट हटवावे नाहीतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.- उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील
  • कुणीही उठेल आणि ट्विट करत बसेल म्हणून न्यायालयाने आपला निर्णय बदलावा का? त्यामुळे ट्विटवर प्रतिक्रिया देणार्‍यांकडे दुर्लक्ष करा – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
  • जर सलमानने असं म्हटलं असेल तर तुम्ही त्याच्या भावनांना समजून घ्या – शत्रुघ्न सिन्हा, खासदार आणि अभिनेते

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close