नाशिक महानगरपालिकेवरही भगवा

December 7, 2009 10:33 AM0 commentsViews: 5

7 डिसेंबर मुंबई, ठाणे पाठोपाठ आता नाशिक महानगरपालिकेवरही शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या नयना घोलप यांची नाशिकच्या महापौरपदी निवड झाली आहे. महापौरपदासाठी काँग्रेसच्या माया दिवे आणि शिवसेनेच्या नयना घोलप यांच्यात थेट लढत होती. त्यात शिवसेनेच्या नयना घोलप यांनी बाजी मारली. घोलप यांना 50, तर काँग्रेसच्या माया दिवे यांना 39 मत मिळाली. तर उपमहापौरपदी भाजपाच्या देवयानी फरांदे यांची निवड झाली आहे. मनसेने गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तसेच इतरही पक्ष तटस्थ राहिले.

close