राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत ललित मोदींना धक्का

December 7, 2009 11:20 AM0 commentsViews: 4

7 डिसेंबर राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांनी ललित मोदींचा पराभव केला आहे. या पदासाठी आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांच्यामध्ये जोरदार शर्यत होती. या निवडणुकीत जोशी यांनी मोदींचा 6 मतांनी पराभव केला. आरसीएच्या निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा मोदींचा पराभव झाला. याआधी संजय दिक्षित यांनी मोदींचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना मोदी आणि जोशी समर्थकांमध्ये हाणामारी झाली. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या शिवचरण मोदी यांनी अखेरच्या क्षणाला माघार घेतल्याने या दोघांमध्ये थेट लढत होती.

close