LIVE : पंजाब दहशतवादी हल्ल्यात 8 ठार, धुमश्चक्री सुरूच

July 27, 2015 2:59 PM0 commentsViews:

panjab attack

अपडेट्स

अतिरेकी हल्ल्यात गुरुदासपुरचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंह शहीद

पोलिसांच्या चकमकीत एक अतिरेकी ठार
हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू, एक दहशतवादी ठार तर दोन पोलीस शहीद
गुरुदासपूरजवळच्या रेल्वे ट्रॅकवरचे पाचही जिवंत बॉम्ब निकामी करण्यात यश,मोठी जीवितहानी टळली
सीमाभागातल्या दलांना अतिदक्षतेचा इशारा
दहशतवादविरोधी पथक गुरूदासपूरसाठी रवाना – पर्रिकर
पंजाब दहशतदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी

सीमाभागातल्या दलांना अतिदक्षतेचा इशारा
दहशतवादविरोधी पथक गुरूदासपूरसाठी रवाना – पर्रिकर
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये हाय अलर्ट

- दीनानगर पोलीस स्टेशनमध्ये असलेले सर्व पोलीस ठार
– शिवाय लॉकअपमध्ये असलेले दोघांनाही दहशतवाद्यांनी ठार मारलं
– आतापर्यंत 3 नागरिकांचा मृत्यू
– लष्कराला पाचारण करण्यात आलंय

===============================================================================

27 जुलै :: पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत किमान 8 जण ठार झालेत. त्यामध्ये एका दहशतवाद्याचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्याला लक्ष्य केलं, त्यामध्ये गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक, 1 पोलीस अधिकारी, 2 होमगार्ड आणि 4 पोलिसांचा मृत्यू झाला. तसंच 3 नागरिकही ठार झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याला आता 10 तास झालेत, पण अजूनही नक्की किती दहशतवादी आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

गुरुदासपूर हा पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला जिल्हा आहे. दिनानगर इथं आज पहाटे 5 वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला. तेव्हापासून इथं चकमक सुरू आहे. सध्या हे दहशतवादी दिनानगर पोलीस ठाण्यात आहेत, घटनास्थळी लष्कर तैनात आहे आणि त्यांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. तसंच आता जम्मू आणि काश्मीरची SWAT म्हणजे special weapons and tactics चं पथक घटनास्थळी दाखल झालंय.

हा हल्ला करण्यापूर्वी आज पहाटे 4 ते 5 दहशतवाद्यांनी एक मारुती कार चोरली आणि एका रस्त्यावरच्या बसवर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी शेजारच्या पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला. साधारण त्याच सुमाराला पठाणकोट-गुरदासपूर रेल्वे रुळावर 5 आयईडी सापडले. या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक वर्षांपासून शांत असलेल्या पंजाबला धक्का बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने बैठक बोलावलीये. तर अतिरेक्यांविरोधातल्या कारवाईसाठी आता लष्करही सक्रिय झालंय. लष्कराची टीम गुरूदासपूरमध्ये आहे आणि त्यांनी संपूर्ण परिसर रिकामा केलाय.

दरम्यान, गुरूदासपूरचे पोलीस अधीक्षक बलजितसिंग धिल्लो या हल्ल्यात शहीद झालेत. गोळी लागल्यानं बलजितसिंग हल्ल्यात ठार झाले. तर 4 पोलीसही शहीद झालेत.

तर दुसरीक डे या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संसदेतही उमटले. काँग्रेसनं हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, हल्ल्याविरोधातली कारवाई संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री उद्या संसदेत निवेदन करणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close