#पंजाबअतिरेकीहल्ला : पहाटेपासून काय घडलं ?

July 27, 2015 12:41 PM0 commentsViews:

punjab_car_ at27 जुलै : दहशतवादी हल्ल्याने पंजाब हादरलंय. पहाटेपासून पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडालीये. दहशतवाद्यांनी सुरुवातील एका दुकानदारावर हल्ला केला. त्याची मारूती कार चोरली आणि तिथून ते दिनानगरला गेले.

पहाटे 5 वाजता तिथे पोहचल्यावर मारुती कारमधल्या पाचही दहशतवाद्यांनी राज्य परिवहनच्या बसवर हल्ला केला. बसवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी जवळच असलेलं पोलीस स्टेशन गाठलं.

पोलीस स्टेशनच्या आवारात पोहोचताच त्यांनी फायरींग सुरू केलं. या गोळीबारात नागरिक जखमी झाले. नंतर यातल्या 3 नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिनानगर पोलीस स्टेशनजवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर 5 बॉम्ब सापडले. नंतर हे पाचही बाँब निकामी करण्यात आले.

पहाटेपासून काय घडलं ?

- 5 अतिरेकी लष्करी गणवेशात आले
– अतिरेक्यांनी एका दुकानदारावर हल्ला केला
– त्याची मारूती कार चोरली आणि तिथून ते दिनानगरला गेले
– पहाटे 5 वा. अतिरेक्यांनी जम्मूला जाणार्‍या एका बसवर हल्ला केला
– त्यानंतर अतिरेक्यांनी दिनानगर पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला
– गोळीबार करत अतिरेक्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दबा धरला
– पोलीस स्टेशनच्या आवारात पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला
– पहाटे 5 वाजताच दिनानगर पोलीस स्टेशनजवळच्या रेल्वे ट्रॅकवर 5 बॉम्ब सापडले
– नंतर हे पाचही बॉम्ब निकामी करण्यात आले

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close