बाबरी प्रकरणात राणे, भुजबळ आणि निरुपमही सहभागी – मुलायमसिंह यादव

December 7, 2009 11:59 AM0 commentsViews: 5

7 डिसेंबरबाबरी विध्वंस प्रकरणी तेव्हा शिवसेनेत असलेले नारायण राणे, छगन भुजबळ आणि संजय निरुपम यांचाही हात होता असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी केला. पण हे तिनही नेते सध्या काँग्रेस किंवा आघाडी सरकारमध्ये आहेत. तसंच त्यांना मंत्रीपदंही देण्यात आली आहेत. मुलायमसिंग यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभेत लिबरहान आयोगाच्या अहवालावर चर्चा सुरू आहे. मुलायमसिंग यादव यांनी अनपेक्षितपणे केलेल्या आरोपांनंतर विरोधक आणि सत्ताधारी गटात शांतता पसरली होती.

close