हल्ल्याबाबत केंद्राकडून कोणतीही माहिती मिळाली नव्हती – प्रकाश सिंह बादल

July 27, 2015 5:58 PM0 commentsViews:

badal_647_072715011811

27 जुलै : गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या आहे आणि अशा कुठल्या हल्ल्याची माहिती केंद्र सरकारला होती तर मग सीमा सील का करायला हव्या होत्या, असं बादल यांनी म्हटलं आहे. अतिरेकी काही पंजाबमधून आलेले नव्हते, असंही ते म्हणाले.

पंजाबमधल्या गुरुदासपूरमध्ये आज (सोमवारी) दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. यात 2 दहशतवाद्यांसह 9 जणं ठार झाले आहे. हा अत्यंत दुदैर्वी हल्ला होता आणि अनेक वर्षांनंतर पंजाबमध्ये असा हल्ला झाल्याचं बादल यांनी म्हटलं. पण, गुप्तचर यंत्रणेकडून राज्याला कुठलाही अलर्ट मिळाला नव्हता, असा दावा करत केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे, असा आरोप पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याने पंजाब सरकारविरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

गुरुदासपूरमधील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याची शक्यता वर्तविली होती तर बीएसएफ आणि भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी रोखण्यापासून प्रयत्न का नाही केले. देशात होणारी घुसखोरी रोखण्याचे काम केंद्र सरकारचं आहे. मग त्यांनी पाकिस्तानलगतच्या सर्व सीमा सील का नाही केल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close