विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना दिली राम प्रधान अहवालाची प्रत

December 8, 2009 9:33 AM0 commentsViews: 1

8 डिसेंबर विरोधी पक्षांनीच मुख्यमंत्र्यांना राम प्रधान अहवालाची प्रत सादर केली. शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना अहवालाची ही प्रत सादर केली. हा अहवाल फुटला नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. तसंच अहवालाची प्रत विरोधी पक्षांनी आपल्याला अजून दिलेली नाही, ती दिल्यास योग्य ती कारवाई करू असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षांनीच आता मुख्यमंत्र्यांना प्रत देऊन कारवाईची मागणी केली आहे. विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आयबीएन-लोकमतच्या आजच्या सवाल या कार्यक्रमात हा अहवाल आपल्याकडे असल्याचं सांगितलं होतं.

close