12 तासांनंतर धुमश्चक्री थांबली; 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

July 27, 2015 8:48 PM0 commentsViews:

27 जुलै : पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन तब्बल 12 तासांनंतर संपुष्टात आली आहे. दिनानगर पोलीस ठाण्यात लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्याला लक्ष्य केलं, त्यामध्ये 9 जण मृत्युमुखी पडले. यामध्ये एका पोलीस अधीक्षकासह 3 पोलीस शहीद झाले आहेत, तसंच तीन सामान्य नागरिकांचा समावेश आहे.

हल्ल्याचा पूर्वनियोजित कट आखून आलेल्या दहशतवाद्यांनी आज (सोमवारी) पहाटे पाचच्या सुमारास पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील दीनानगर शहरात हल्ला केला. दहशतवाद्यांनी एका मारुती मोटारच्या चालकावर हल्ला करून ती ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांनी गुरुदासपूरहून जम्मूकडे निघालेल्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केला आणि ते गुरुदासपूर पोलीस ठाण्यामध्ये घुसले. पोलीस ठाण्यामध्ये दहशतवादी आणि पोलीसांमध्ये मोठी चकमक उडाली. त्यात 2 पोलिसांसह 8 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि पंजाब पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती.

terror_punjab2

दरम्यान, पंजाब पोलीसांना दिनानगर ते पठाणकोट या मार्गावरील रेल्वेरूळांवर पाच जिवंत बॉम्बही सापडले. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी लष्कराचे बॉम्ब शोधक पथक हे बॉम्ब निकामी करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

एनएसजी आणि SWATचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल 12 तास उलटल्यानंतरही सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू होती. अखेर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देत, पोलिसांना प्रतिहल्ल्यात तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.

===========================================================================================

टार्गेट गुरदासपूर

पहाटे 4 :30
– 4 अतिरेकी आले लष्करी गणवेशात
– अतिरेक्यांनी एका दुकानदारावर केला हल्ला
– दुकानदाराची मारुती कार चोरून दिनानगरला पलायन

पहाटे 5 वा.
अतिरेक्यांनी जम्मूला जाणार्‍या एका बसवर केला हल्ला
हल्ल्यात 3 नागरिक मृत्युमुखी
त्यानंतर अतिरेक्यांनी दिनानगर पोलीस स्टेशनवर चढवला हल्ला
पोलीस स्टेशनच्या आवारात पोहोचताच सुरू केला गोळीबार
गोळीबारात वरिष्ठ अधिकार्‍यासह 3 पोलीस शहीद

पहाटे 5
दिनानगर पोलीस स्टेशनजवळच्या रेल्वे ट्रॅकवर सापडले 5 बॉम्ब
नंतर हे पाचही बाँब निकामी करण्यात आले.

सकाळी 9:30
पंजाबच्या खास सुरक्षा दलाचे जवान तैनात
दहशतवाद्यांशी लढताना 2 पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू

दुपारी 2:40
एका अतिरेक्याला कंठस्नान

दुपारी 3:15
दुसर्‍या अतिरेक्याला कंठस्नान

संध्या. 5 :00
सुमारे 12 तास सुरू असलेली कारवाई संपली
तीन दहशतवादी ठार झाल्याचं जाहीर

===========================================================================================

गुरदासपूरला का केलं लक्ष्य?
– गुरदासपूरमधल्या हल्ल्याचं ठिकाण जम्मूच्या जवळ आहे.
– गुरदासपूरहून जम्मूमार्गे अमरनाथला हा मार्ग जातो.
– गुरदासपूर हे खलिस्तानी अतिरेक्यांचं एक महत्त्वाचं केंद्र आहे.
– अतिरेकी लष्कराच्या वेषात आले.
– काश्मीरमधल्या कथुआ हल्ल्यात अतिरेक्यांनी हीच पद्धत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close