नागपूर अधिवेशनात शिवसेनेचं पहिल्याच दिवशी ‘फियान’

December 8, 2009 9:42 AM0 commentsViews: 4

8 डिसेंबर विधानसभा अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी शिवसेना सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आक्रमक झाली. फियानग्रस्त आणि अवकाळी पाऊस, वादळात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी सेनेने केली. या प्रकारामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. शिवसेनेच्या आमदारांनी मंगळवारी कोळी बाधवांच्या वेषात अधिवेशनात घोषणाबाजी केली. फियानग्रस्तांना पुरेशी मदत द्या अशी मागणी त्यांनी केली. फियानग्रस्तांच्या प्रश्नासाठी शिवसेनेच्या आमदारांनी कोळी बांधवांचा पेहराव केला होता. काहींनी टोप्या घातल्या काही जण कोळ्यांच्या वेशभूषेत आले. पण यात एक गोम होती. शिवसेनेचे सभागृहातले गटनेते सुभाष देसाईंनी मात्र आपल्या पांढरा कोट उतरवला नाही. शिवसेनेमध्ये देसाई शहरी तोंडवळ्याचे नेते म्हणून ओळखले जातात. इतर आमदारांनी घोषणाबाजी करत या आंदोलनादरम्यान उचललेले प्रश्न ग्रामीण भागातले आहेत. त्यामुळे शहरी देसाईंना त्याची तीव्रता कळली नसावी अशी चर्चा विधानभवनात सुरुच राहीली.

close