देशाचा मार्गदर्शक हरपला- नरेंद्र मोदी

July 27, 2015 11:33 PM0 commentsViews:

officialkalam modi

27 जुलै : ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. कलाम यांच्या जाण्याने देशाचा मार्गदर्शक हरपल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी दिली.

डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचं आज (सोमवारी) रात्री शिलाँगमधल्या बेथानी रुग्णालयात निधन झाले. शिलाँगच्या आयआयएममध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अब्दुल कलाम अचानक व्यासपीठावर कोसळले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री पावणे आठच्या सुमारास कलाम यांनी अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाराच्या धक्क्याने कलाम यांचं निधन झाल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

अब्दुल कलाम यांचं जाणं संपूर्ण देश आणि जगासाठी दु:खद वार्ता आहे. कलाम यांनी भारताला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांचं जीवन, त्यांचं बोलणं आणि विचार देशासाठी दिशादर्शक होतं, असं मोदी म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close