आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मनसेची मागणी

December 8, 2009 9:47 AM0 commentsViews: 3

8 डिसेंबरमनसेच्या 4 आमदारांचं निलंबन रद्द करावं, ही प्रमुख मागणी करत मनसेच्या आमदारांनी मंगळवारी काळ्या टोप्या घालून विधान भवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली. अबू आझमींना विधानसभेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी मनसेच्या 4 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या आमदारांवर झालेली निलंबनाची कारवाई रद्द व्हावी यासाठी विधानसभेत मागणी करणार असल्याचं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. शिवसेना मात्र या विषयावर गप्प आहे. मंगळवारी मनसेच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी केली.

close