याकूब मेमनच्या फाशीला अंतरिम स्थगिती

July 28, 2015 2:02 PM0 commentsViews:

YakubAbdulRazakMemon_b28 जुलै : 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिलीये. त्यामुळे याकूबची फाशी लांबण्याची शक्यता आहे. याकूबच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत स्थगिती देण्यात आलीय. आणि हा खटला सरन्यायाधीशांच्या बेंचकडे पाठवण्यात आलाय. या खटल्यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होण्यासाठी लवकरात लवकर वरिष्ठ बेंच स्थापन करावा, अशी मागणी ऍटर्नी जनरलनी कोर्टात केलीये.

याकूब मेमनला 30 जुलैला फाशी दिली जाणार होती. पण, याकूबने सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा धाव घेतली. याकूबने कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. पण, याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवरुन दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. त्यामुळे याकूबच्या फाशीला अंतरिम स्थगिती देण्यात आलीये. हा खटला वरिष्ठ बेंचकडे पाठवण्यात आल्याय. याकूबने याअगोदरही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close