जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील यांना पक्षाची नोटीस

December 8, 2009 12:10 PM0 commentsViews: 75

8 डिसेंबरअहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील यांना काँग्रेसने नोटीस बजावली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाविरुध्द काम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. या बाबतीत 7 दिवसांच्या आत खुलासा करण्याचं त्यांना सांगण्यात आल आहे. शालिनीताई या बाळासाहेब विखे-पाटील यांच्या सून, तर परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित तांबे यांच्याविरोधात शालिनीताई यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांनी मधूकर पिचड, भाजप आणि काही बंडखोरांच्या मदतीने अध्यक्षपद मिळवलं होतं. त्यानंतर चौकशी समिती नेण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर काँग्रेसने ही कारवाई केली आहे.

close