एका वेगळ्या स्वरुपात सुरू राहणार अब्दुल कलाम यांचं ट्विटर अकाऊंट

July 28, 2015 3:52 PM0 commentsViews:

kalam1

28 जुलै : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला घेतला असला तरी त्यांचे ट्विटर अकाऊंट भविष्यात सुरुच राहणार आहे. डॉ. कलाम यांच्या निकटवर्तीयांनी कलाम यांचे ट्विटर अकाऊंट वेगळ्या स्वरुपात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून ‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावानं हे ट्विटर अकाऊंट सुरू ठेवण्यात येईल.

मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंट असून कलाम यांच्या मृत्यूनंतरही हे अकाऊंट सुरुच ठेवण्याचा निर्णय कलाम यांचे निकटवर्तीय श्रीजन पाल यांनी घेतला आहे. या अकाऊंटच्या माध्यमातून डॉ. कलाम यांचे विचार, त्यांनी हाती घेतलेले कार्य, त्यांची शिकवणूक लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हे अकाऊंट पूर्णपणे डॉ. कलाम यांना समर्पित असेल, असे श्रीजन पाल सिंग यांनी एका ट्विटच्या साह्याने मंगळवारी सांगितलं.

तरुणांना आणि सामान्यांना प्रोत्साहन देणारी कलाम यांची वाक्ये, त्यांच्या वेगवेगळ्या भाषणातील लक्षवेधक मुद्दे, त्याचबरोबर त्यांच्या विंग्ज ऑफ फायर, इंडिया 2020, इग्निटेड माईंड्स या पुस्तकातील विचार या ट्विटर अकाऊंटवर प्रकाशित करण्यात येणार आहेत. श्रीजन पाल सिंग हेच या अकाऊंटचे काम पाहणार आहेत. डॉ. कलाम यांचे ट्विटरवर 14 लाख फॉलोअर्स आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close