मुंबईकरांसाठी म्हाडाची आणखी साडेतीन हजार घरं

December 8, 2009 12:11 PM0 commentsViews: 5

8 डिसेंबरमुंबईत सर्वसामान्यांसाठी आणखी 3 हजार 557 घरांची सोडत लवकरच म्हाडा काढणार आहे. यावेळी म्हाडाने सर्वसामान्यांना खुश करायचं ठरवलं आहे. त्यासाठी अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक म्हणजे अडीच हजार घरं असणार आहेत. वर्सोवा, तुर्भे – मानखुर्द, सायन- प्रतीक्षानगर, घाटकोपर इथल्या कॅनरा इंजिनिअरिंग, मालाड- मालवणी, शैलेंद्रनगर दहिसर आणि पवई इथे ही घरं उपलब्ध केली जातील. 16 डिसेंबरपासून या घरांसाठी अर्जविक्री सुरु होणार आहे. तर एप्रिल महिन्यात लॉटरीची सोडत काढली जाईल.

close