5 किलो युरेनिअमसदृश्य पदार्थासह नवी मुंबईत तिघांना अटक

December 8, 2009 1:54 PM0 commentsViews: 3

8 डिसेंबर युरेनिअमसदृश्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी नवी मुंबई क्राईम ब्रांचने 3 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडील 5 किलो युरेनिअमसारखा दिसणारा पदार्थही पोलिसांनी ताब्यात घेतला आणि या पदार्थाची तपासणी BARC आणि IB च्या टीमने केली. मिनरल डायरेक्टरी फॉर एक्सप्लोजन ऍन्ड रिसर्च संस्थेचे रिजनल डायरेक्टर मृणाल राय यांनी पनवेल पोलिसांत तक्रार केली आहे. ऍटॉमिक ऍक्टनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. हे युरेनियम अतिघातक नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणातील आरोपी प्रेमसिंग तंगायान सावित्री (42) हा साईनगर पनवेल इथे राहणारा आहे. तर श्रीनिवास व्यंकट हा दुसरा आरोपी आहे. या आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी एक आरोपी खनिज शास्त्रज्ञ आहे.

close