नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू

July 29, 2015 12:44 PM0 commentsViews:

navi mumbai_bulding29 जुलै : नवी मुंबईतील करावे गावातील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. तर 3 जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

अनधिकृतरित्या उभारण्यात येणार्‍या इमारतीचा काही भाग शेजारील घरावर कोसळला यामध्ये महेंद्र खंदारे आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी परी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी रंजना आणि 7 वर्षाचा मुलगा संघरत्न हे जखमी आहेत. या घटनेतनंतर नवी मुंबईतील गावांमधून सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या सुरक्षेची प्रश्न पुन्हा समोर आलाय. अशा इमारतीमुळे निष्पाप जिवांचे बळी जात आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल नवी मुंबईकर करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close