संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना मॅगसेसे पुरस्कार

July 29, 2015 1:38 PM0 commentsViews:

Sanjeev Chaturvedi, Anshu Gupta29 जुलै : आशिया खंडातला प्रतिष्ठेचा मानाला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार दोन भारतीयांना जाहीर झालाय. सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि समाजसेवक आणि गूँज या संस्थेचा संस्थापक अंशू गुप्ता यांना २०१५ चा रॅमन मॅगसेसे हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय.

भ्रष्टाचाराविरोधात अविरत लढा देणे, खरेपणा आणि सचोटीनं काम करणे यासाठी चतुर्वेदी यांचा गौरव करण्यात आलाय. तर अंशू गुप्ता यांचंही कार्य खूप मोठं आहे. गेली अनेक वर्षं ते गूँज संस्था चालवतायत. जुन्या गोष्टींचं पुर्नवापर करुन ते गरिबांसाठी वस्तू बनवतात, आणि त्याचं वाटपही करतात. देशातल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमध्येही अंशू गुप्ता यांनी खूप मदतकार्य केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close