राम प्रधान अहवाल फुटला नाही- मुख्यमंत्री

December 9, 2009 9:05 AM0 commentsViews: 6

9 डिसेंबर राम प्रधान समितीचा अहवाल फुटला नाही. अहवालाच्या चारही प्रती कस्टडीत सुरक्षित आहेत. तसंच विरोधकांनी सादर केलेल्या अहवालाचा मूळ अहवालाशी संबंध नाही. तरीसुद्धा विरोधकांचा अहवाल गृहमंत्र्याकडे तपासासाठी पाठवलेला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. तर याचवेळी हा अहवाल आपल्याला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याच माणसाकडून मिळाल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. विधानसभेत याच प्रश्नावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने तो फेटाळून लावला असला तरी चर्चेची तयारी मात्र दाखवली.

close