राष्ट्रपतींना पत्र पाठवणार्‍या मुस्लीम आमदारांविरोधात शिवसेनेचा हक्कभंगाचा प्रस्ताव

July 29, 2015 2:54 PM0 commentsViews:

SENA AGAINST YAKUB

29 जुलै : याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेच्या मुद्द्यावरून आज (बुधवारी) विधानसभेत गदारोळ झाला. काँग्रेच्या मुस्लिम आमदारांनी याकुबची फाशी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून शिवसेना- भाजपचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. याकुबची फाशी रद्द करण्याची मागणी करणार्‍या सहा आमदारांविरोधात शिवसेनेनं हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.

याकुब मेमनच्या फाशीच्या विरोधात काँग्रेसच्या काही मुस्लिम आमदार आणि नगरसेवकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना पत्र पाठवलं आहे. या पत्रात, याकुबला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांची आहे. काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, आमदार अमिन पटेल, आमदार अस्लम शेख, आमदार शेख असिफ शेख रशीद, मुझफ्फर हुसेन, हुसनाबानो खलीफ, माजी आमदार युसूफ अब्रहानी आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांच्या या पत्रावर स्वाक्षर्‍या आहेत. आज विधानसभेत याचं मागणीला विरोध करत शिवसेनेसे काँग्रेसच्या या सहा आमदारांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close