विक्रम गोखले आणि रिमा पहिल्यांदाच रंगभूमीवर एकत्र

July 29, 2015 3:31 PM0 commentsViews:

29 जुलै :  आपल्या दमदार अभिनयाने गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री रिमा पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, मराठी रंगभूमीवर ही जोडी पहिल्यांदाच पाहण्यास मिळणार आहे. सुयोग नाट्य संस्थेचं नवीन नाटक ‘के दिल अभी भरा नही’ हे ऑगस्ट अखेर रंगमंचावर येणार आहे. शेखर ढवळीकर यांचं लेखन असलेल्या या नाटकात विक्रम गोखले आणि रिमा हे दिग्गज रंगमंचावर एकत्र येणार आहेत. मंगेश कदम या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. विक्रम गोखले आणि रिमासोबत या नाटकात जयंत सावरकरही या नाटकात आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close