पशूधन घोटाळयाप्रकरणी सीबीआयचे छापे

December 9, 2009 9:16 AM0 commentsViews: 2

9 डिसेंबर आदिवासी विकास विभागाच्या पशूधन घोटाळ्याप्रकरणी धुळे, नंदूरबार, कळवण इथल्या प्रकल्प अधिकार्‍यांच्या ऑफिसवर सीबीआयने छापे टाकले आहेत. या छाप्यात अनेक अधिकार्‍यांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे. या प्रकणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे 55 अधिकारी राज्यात दाखल झालेत. त्यांनी घोटाळ्यात सामील असणार्‍या अधिकार्‍यांच्या घरावर आणि ऑफिसवर तसंच सेवा सहकारी सोसायट्यांवरही छापे टाकायला सुरुवात केली आहे. 2004 पासून सुरु असलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा तपास हे अधिकारी बारकाईने करत आहेत.

close