कोणतंही राजकीय पाठबळ नसल्याने याकूबला फाशी – ओवैसी

July 29, 2015 7:45 PM0 commentsViews:

êÖêËÖÖêêßÖêy29 जुलै :  याकूब मेमनला फाशी देण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक असून याकूबला राजकीय पाठबळ नसल्यानेच त्याला फाशी दिली जात असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

याकूब मेमनच्या फाशीवर आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असून याकूबला उद्या त्याच्या जन्मदिनी सकाळी सात वाजता फाशी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवैसी यांनी याकूबच्या फाशीला विरोध दर्शवला.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक आहे, याकूबला राजकीय पाठबळ नसल्यानेच त्याला फाशी दिली जात आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला आहे. याकूबला फाशी देऊन बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या 250 जणांना न्याय मिळणार असेल तर बाबरी मशीद पाडल्यावर झालेल्या दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या 900 जणांना न्याय कधी मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बाबरी मशीद पाडणारे आता सत्तेत बसले आहेत पण याप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा होते की नाही हे मला पाहायचं आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close