पंतप्रधानांनी मागितली संसदेत माफी

December 9, 2009 9:19 AM0 commentsViews: 1

9 डिसेंबरबेनी प्रसाद वर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल लोकसभेत असभ्य भाषा वापरल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी माफी मागितली. लिबरहान अहवालावर संसदेत चर्चा सुरू असताना काँग्रेसचे खासदार बेनी प्रसाद वर्मा यांनी मंगळवारी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. वर्मा माफी मागत नाही तोपर्यंत लोकसभेचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. याच मुद्यावरून मंगळवारी संसदेत मोठा गदारोळही झाला होता.

close