मध्यरात्री याकूबसाठी वकिलांची धडपड, पण कोर्टाने याचिका फेटाळली

July 30, 2015 5:42 AM0 commentsViews:

prashan bhusan_yakub30 जुलै : 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनची फाशी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलीये. आधी ठरल्याप्रमाणे आज सकाळी सात वाजता याकूबला फाशी देण्यात येणार आहे. मात्र, बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत याकूबच्या फाशी प्रकरणाने नाट्यमय वळणं घेतली.

याकूब मेमन याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळल्यानंतर रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान याकूब मेमन याच्या वकिलांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन याचिका केली. याकूबच्या वकीलांसोबत दिग्गज वकीलांची टीम होती. त्यामध्ये प्रशांत भूषण, नित्या रामकृष्ण, आनंद ग्रोवर यांचा समावेश होता.

यानंतर काहीवेळाने सरन्यायाधिशांच्या घरातून सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्याचा निर्णय झाला. सुप्रीम कोर्टात पहाटे अडीच वाजता पुन्हा सुनावणीला सुरूवात झाली. तीन न्यायाधिशांच्या बेंचवर सुनावणी सुरू झाली. यामध्ये न्यायमूर्ती पीसी पंत, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अमिताभ रॉय यांचा समावेश होता. तर अटर्नी जनरल मुकुल रोहतगीही सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात हजर होते. तर याकूब मेमनची बाजू याकूबचे वकील, प्रशांत भूषण आणि नित्या रामकृष्णन यांनी मांडली. एकीकडे मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सुप्रीम कोर्टात याकूबच्या फाशीवर सुनावणी सुरू होती. तर सुप्रीम कोर्टाबाहेर याकूबच्या फाशीच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं होतं. पोलिसांनी तत्काळ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close