याकूबला 3 वाजता उठवलं, 6.35 ला लटकवलं

July 30, 2015 9:06 AM0 commentsViews:

YakubHanged_new30 जुलै : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. फाशी टाळण्यासाठी याकूबने बर्‍याच खटाटोप केला. पण अखेरीस आज फास आवळला गेला आणि याकूबला फासावर लटकवण्यात आलं. आज पहाटे नागपूर जेलमध्ये काय काय घडलं त्याचा हा आढावा…

याकूबच्या फाशीची प्रक्रिया 

- पहाटे 3 वाजता फाशीची प्रक्रिया सुरू
– 3 वाजता याकूबला उठवण्यात आलं
– 3.10 ला याकूबला आंघोळीसाठी नेण्यात आलं
– त्यानंतर पांढर्‍या रंगाचे नवे कपडे दिले
– 3.25 सुमारास याकूबला आवडीचा नाश्ता देण्यात आला
– 3.40 च्या सुमारास याकूब मेमननं नमाज अदा केली
– याकूबला धार्मिक पुस्तक वाचायला दिली
– दरम्यान याकूबच्या फाशीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती
– 4.30 वाजता याकूबला बॅरेकमधून बाहेर काढण्यात आलं
– 5 वाजता सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
– कोर्टाच्या निर्णयानंतर याकूबला कोठडीत नेण्यात आलं आणि गुन्हाची माहिती देण्यात आली
– 6.15 याकूबला फाशी का देण्यात येते याबद्दल सांगण्यात आलं
– 6.35 वा. याकूबला फाशी दिली
– 7.01 मिनिटांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं
– याकूबच्या मृतदेहाचं जेलमध्ये पोस्टमॉर्टेम
– फाशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं
– फाशीवेळी मॅजिस्ट्रेट आणि वैद्यकीय पथक हजर होतं
– याकूबच्या नातेवाईकांपैकी कुणीही फाशीच्या वेळी हजर नव्हतं

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close