26/11च्या हल्ल्याच्या ठिकाणांची हेडलीने पाहणी केली – एफबीआय

December 9, 2009 9:24 AM0 commentsViews: 6

9 डिसेंबर डेव्हीड हेडली यानेच 26/11 च्या हल्ला स्थळाची पाहणी केल्याचं अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे या बाबीचा खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई हल्ल्याचा खटला गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु आहे. या खटल्यात गेल्या महिन्याभरात डेव्हीट हेडलीचा मुद्दा पुढे आला. हेडलीला एफबीआयने महिन्याभरापूर्वी अटक केली. तो मुंबईत अनेकदा आला होता. तसेच तो कोणाकोणच्या संपर्कात आला, हेही आत्तापर्यंतच्या तपासात पुढे आल आहे. एवढंच नाही तर त्यानेच हॉटेल ताज, ट्रायडंट तसंच इतर ठिकाणांची त्याने पाहणी केल्याची कबुली दिल्याचं एफबीआयने म्हटलं आहे. तर या खटल्यात पाहाणी केल्याप्रकरणी सब्बाउद्दीन आणि फईम अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. पण आता एफबीआयच्या नव्या माहितीमुळे दोघा आरोपींना फायदा होण्याची शक्यता आहे.

close