स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरून आंध्रप्रदेशातलं वातावरण चिघळलं

December 9, 2009 9:30 AM0 commentsViews: 3

9 डिसेंबर स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी भडकलेल्या आंदोलनामुळे आंध्र प्रदेश जवळपास ठप्प झाल्याचं चित्र आहे. राज्यातली सर्व विद्यापीठं आणि होस्टेल्स 10 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. तेलंगणा प्रांतात हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलं तैनात झाली आहेत. जवळपास 8 हजार पोलीस, शीघ्र कृती दल, सीआरपीएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. हैदराबाद इथे सर्व चेक नाक्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. आंध्र प्रदेश मधील 10 जिल्ह्यांमध्ये जमाव प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. राज्यातल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री रोसैय्या बुधवारी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. टीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांच्या उपोषणाचा 11 दिवस आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे.

close