मिरज दंगलीतील सर्व गुन्हे मागे

December 9, 2009 12:38 PM0 commentsViews: 2

9 डिसेंबर मिरज दंगल प्रकरणी सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला आहे. विधानभवनातल्या कार्यालयात पोलीस महासंचालक अनॉमी रॉय, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते इत्यादी नेत्यांशी पाटील यांनी चर्चा केली. त्यानंतर खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या दंगल प्रकरणी सुमारे 100हून अधिक गुन्हे दाखल झाले होते. गणेश उत्सवाच्या काळात मिरजमध्ये अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लावल्यानं ही दंगल भडकली होती.

close