शेकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दारूबंदी करा- नारायण राणे

December 9, 2009 12:42 PM0 commentsViews: 2

9 डिसेंबर शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा आणि वर्धा या सहा जिल्ह्यांत दारूबंदी करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. गावठी दारूच्या धंद्यावर कठोर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. कर्जबाजारीपणा हे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागचं कारण आहे, असं सांगितलं जातं आहे. पण यामागे सामाजिक कारणंही आहेत, दारूच्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या शेतकर्‍यांना या व्यसनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं राणे यांचं म्हणणं आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या पॅकेजमधून शेतकर्‍यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

close