येऊरच्या जंगलात संध्याकाळी सहानंतर बंदी

December 9, 2009 1:34 PM0 commentsViews: 3

9 डिसेंबर ठाणे जिल्ह्यातल्या येऊर जंगलात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जाऊ नये या फोरेस्ट ऍक्टचं पालन करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. जंगल वाचविण्यासाठी मुंबई हायकोर्टाने हा आदेश दिला आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 6 नंतर जंगलाच्या आत असलेल्यांनाही बाहेर काढण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. रात्रभर जंगलात होणार्‍या पाटर्‌या आणि बेकायदा बांधकाम यामुळे जंगलाचं नुकसान थांबावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.

close