कोमेन चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल,ओडिशाला तडाखा

July 31, 2015 10:33 AM0 commentsViews:

cyclone komen31 जुलै : कोमेन चक्रीवादळानं पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जोरदार तडाखा बसलाय. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कोमेन चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मात्र फायदा होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणातही पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

कोमेन या चक्रीवादळानं बांगलादेशला तडाखा दिलाय. त्यानंतर ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाकडे सरकलं. या वादळामुळे या दोन्ही राज्यांमध्ये जोरदार वारे सुटलेत. कोमेन चक्रीवादळाच्या संकटामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला इंग्लंडचा दौरा आटोपता घेतला. खबरदारीसाठी पश्चिम बंगाल सरकारनं पूर आणि चक्रीवादळ नियंत्रण कक्ष स्थापन केलाय. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आज दुपारी उच्चस्तरीय बैठक बोलावलीय.

ओडिशाला पुराचा फटका

दरम्यान, ओडिशामधल्या सहा जिल्ह्यांमध्ये लाखो नागरिकांना पुराचा फटका बसलाय. जयपूर जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसलाय. शेतांमध्ये पाणी घुसून उभ्या पिकांचं नुकसान झालंय. अनेक खेडी उद्‌ध्वस्त झालीयेत. वैतरणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. या पुराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलंय. सहा जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामध्ये आणखी वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे राज्यातली पूरस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close