आयबीएन-लोकमतच्या रिपोर्ताजला UNFPAचा ‘लाडली’ पुरस्कार

December 10, 2009 10:05 AM0 commentsViews: 7

10 डिसेंबर 'आयबीएन-लोकमत'वरील स्त्री-पुरुष समानतेबद्दलच्या संवेदनशील पत्रकारितेची दखल युनायट नेशन्स पॉप्युलेशन फंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली आहे. आयबीएन-लोकमतवरील 'हरवलेल्या मुली' या रिपोर्ताजला 'लाडली' या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. जेन्डर सेन्सिटिव्हीटी म्हणजेच संवेदनशील पत्रकारीतेसाठी हा पुरस्कार भारतात चार विभागांमध्ये दिला जातो. पश्चिम विभागात टेलिव्हिजन कॅटेगरीत हा पुरस्कार मिळाला आहे. 'आयबीएन-लोकमत'च्या असोसिएट एडिटर प्राजक्ता धुळप, व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजीत पाटील, व्हिडिओ एडिटर प्रसाद मेस्त्री आणि सोहेल अन्सारी या रिपोर्ताजच्या टीमने हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. मुलींची गर्भातच केली जाते, याचं प्रमाण ग्रामीण भागातच नाही तर सर्वात अधिक शहरात आहे. या प्रकारामुळे होणारे सामाजिक परिणाम याचंही वास्तव हरवलेल्या मुली या रिपोर्ताजमध्ये दाखवण्यात आलं आहे. महिला दिनानिमित्त आठ मार्चला हा रिपोर्ताज दाखवण्यात आला होता. मिळून सार्‍याजणी या मॅगझिनमधून स्त्रियांचे प्रश्न मांडणार्‍या विद्या बाळ यांना लाडली जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र टाईम्सच्या प्रगती बाणखेले यांना अर्धी दुनिया कॉलमबद्दल नवभारत टाईम्सच्या कांचन श्रीवास्तव, टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रीतू नायर, सकाळच्या आरती कदम, हिंदूस्तान टाईम्सच्या नेहा भायना डीएनएच्या रंजना बॅनर्जी राजस्थान पत्रिकेचे महेंद्रसिंग शेखावत, इन्कलाबच्या रईसा अन्सारी यांना प्रिंट कॅटेगरीत लाडली पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आयबीएन-लोकमतच्या प्राजक्ता धुळप, आजतकचे शरत कुमार, एनडीटीव्ही इमॅजिनची ज्योती सिरिअल, ऑल इंडिया रेडिओच्या माधवी घारापुरे आणि उमा दीक्षित यांना इलेक्ट्रॉनिक कॅटेगरीत तर वेबसाठी शिरिष खरे आणि अनोश मानेकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.

close