राहुल गांधींच्या विरोधात FTII समोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं

July 31, 2015 4:10 PM0 commentsViews:

FTII BJP ANDOLAN31 जुलै : एकीकडे राहुल गांधी आज एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना गेटजवळ भाजप कार्यर्त्यांची राहुल यांच्या विरोधात जोरदार निदर्शेने केली. तसंच राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तर एमएसयूआयच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा आज आंदोलनाचा 50वा दिवस आहे. चौहान यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ विद्यार्थी महिन्याभरापासून संपावर गेले आहेत. या संदर्भात 3 जुलै रोजी माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्यासोबतची चर्चाही झाली, पण त्यीतून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघू शकला नाही.

गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा विद्याथीर्ंनी दिला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close