पोलिसांची दंडेलशाही, बळीराजालाच झोडपलं

July 31, 2015 5:41 PM0 commentsViews:

31 जुलै : ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ असं बिरुद मिरवणारे आपले पोलीस बळीराजाल्याचा गुरासारखं झोडपून काढत असल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडलीये. या शेतकर्‍याची चुकी एवढीच होती की, पिक विमा भरण्यासाठी रांगेत उभा राहिला नाही म्हणून पोलिसांनी गुरासारखं झोडपून काढलं.

beed farmar_police

अगोदरच भीषण दुष्काळाच्या छायेने ग्रासलेल्या बळीराजाला विमा भरण्यासाठी पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाड़ा इथं विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकरी मनोहर अश्रुबा गांधले यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार बँकेच्या समोर आणि शेतकार्‍यांसमोर घडला. मात्र, जनावराप्रमाणे मरणार्‍या पोलिसांना अडवण्याची हिंमत कुणाचीच झाली नाही. मराठवाड्यात या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या मात्र मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकं करपली आहेत. अशा वेळी आधार म्हणून शेतकरी पिक विमा भरण्यासाठी घाई करीत आहे. मात्र पावसाने दगा दिल्याने हैराण झालेला बळीराजा आता पोलिसांच्या फटक्याने त्रासाला आहे. अशा पद्धतीने दंडेलशाही करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close