राज्यात उद्यापासून एलबीटी रद्द

July 31, 2015 8:43 PM0 commentsViews:

RETAIL_TRADERS_STR_1449967f

31 जुलै : राज्यातल्या 25 महापालिकांमध्ये उद्यापासून (1 ऑगस्ट) एलबीटी हद्दपार होणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केली.

राज्यातल्या 8,09553 व्यापार्‍यांना एलबीटीमधून सूट देण्यात येणार आहे. तर 50 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या 1,062 व्यापार्‍यांना एलबीटी भरावा लागणार आहे. राज्यातील 25 महापालिकांना मागील पाच वर्षांतील सर्वोच्च आधारभूत उत्पन्नावर 8 टक्के वाढ गृहीत धरून महापालिकांना 7648.82 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

मुद्रांक शुल्कापासून मिळणारे उत्पन महापालिकेला देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेची स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र भरपाई निधी तयार करून त्यातून महापालिकांना निधी देण्यात येणार आहे. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 2048 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर एलबीटी अभय योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close