स्वतंत्र तेलंगणाला केंद्रसरकारची मंजुरी

December 10, 2009 10:09 AM0 commentsViews: 7

10 डिसेंबर स्वतंत्र तेलंगणाच्या प्रस्तावाला केंद्रसरकारने अखेर मंजूरी दिली आहे. स्वतंत्र तेलंगणाचा प्रस्ताव आंध्रप्रदेश विधानसभेत आणला जाईल असं केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जाहीर केलं. तसंच आंदोलकांवरील खटले मागे घेणार असल्याचंही चिंदबरम यांनी सांगितलं. चिदंबरम यांच्या घोषणेनंतर तेलंगणा राष्ट्रीय समितीचे नेते के चंद्रशेखर राव यांनी आपलं 11 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेतलं आहे. तसेच राव यांनी सोनिया गांधीचे आभार मानले आहेत. स्वतंत्र तेलंगणात हैदराबादचा समावेश होणार की नाही यासंदर्भात अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. पण केंद्र सरकारच्या घोषणेनंतर तेलंगणा प्रांतात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. गुरूवारी हैदराबादचा मोर्चा रद्द करुन त्याऐवजी उस्मानिया विद्यापीठाच्या आवारात विजयी सभा घेण्यात येणार आहे. काँग्रेसच्या 50 आमदारांचे राजीनामेआंध्र प्रदेशात स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीच्या विरोधात काँग्रेसच्या 50 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे या आमदारांनी आपले राजीनामे सोपवले. मात्र आता काँग्रेस आमदारांच्याच या भूमिकेनंतर आंध्रात पुन्हा वाद होण्याची चिन्हं आहेत.

close