ट्विटर लवकरच मराठीसह सहा भाषेत !

August 1, 2015 1:58 PM0 commentsViews:

twtter234201 ऑगस्ट : ट्विटर वापरणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी.. ट्विटर आता मराठीत येतंय… काही दिवसांनी तुम्ही मराठी भाषेमध्ये ट्विट करू शकाल. आतापर्यंत मराठी ट्विट्स हिंदी भाषा वापरून केले जायचे. पण आता संपूर्ण मराठी लिपी ट्विटरवर येणार आहे.
मराठीबरोबरच गुजराती, कन्नड आणि तामिळ भाषेतही आता ट्विट करता येईल.

भारतात सोशल मीडियाचा वापर झपाट्यानं वाढतोय आणि यात आपल्या मातृभाषेत ट्विट करणार्‍यांची संख्या कमी नाही. म्हणूनच गेल्या काही महिन्यांमध्ये ट्विटरचा भर प्रादेशिक भाषांवर आहे. मराठी भाषा ट्विटरवर आणणे त्याचाच एक भाग आहे. उल्लेखनिय म्हणजे गेल्या काही दिवसांत ट्विटर ट्रेंडिंगमध्ये मराठी भाषेनं बाजी मारली. मराठी भाषेतील अनेक ट्विट ट्रेंडिंगमध्ये आले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close