चोराचा पाठलाग करताना लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू

August 1, 2015 4:41 PM0 commentsViews:

kalyan train 45301 ऑगस्ट : लोकलने प्रवास करणार्‍या एका महिलेची बँग चोरी करून पळणार्‍या चोरट्याचा पाठलाग करताना महिलेचा लोकलच्या धडकेत दुदैर्वी मूत्यू झाला . नाव प्राजक्ता गुप्ता ( 29 ) असं या महिलेचं नाव असून ती कल्याण परिसरातील राहणारी होती.

प्राजक्ता गुप्ता ही नवी मुंबई महापे इथं एकाआयटी कंपनीत कामाला होती. प्राजक्त कामावरून घराकडे परतताना नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण असा लोकलने प्रवास करीत होती. गुरूवारी रात्री कामावरून घरी परताना तिने नेहमी प्रमाणे ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणारी लोकल ट्रेन पकडली.

प्रवासादरम्यान लोकलच्या दारात उभी होती. रात्री आठच्या सुमारास ही लोकल पत्रीपुलाजवळ थांबली असताना अचानक एका चोरट्याने तिच्या हातातील बँगवर झड़प घालत बॅग हिसकून पळ काढला. प्राजक्ताने ट्रेन मधून उडी मारत चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान कल्याण वरून सीएसटीकडे जाणार्‍या एका लोकलने प्राजक्ताला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा दुदैर्वी अंत झाला. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली.

या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शी महिलांनी तसंच मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिली दिली असून रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस अधिकारी दत्ता पावले यांनी दिली. पण प्रश्न शेवटी हा आहे, की पत्रीपुलाखालची ही काही पहिली घटना नाही.. इथे लोकल हळू होतात आणि यामुळे चोर्‍यांची अनेक प्रकरणं होतात. मग पोलीस इथे गस्त का ठेवत नाहीत, हा प्रश्न आता समोर येतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close