आता का हिंदू टेररची आठवण झाली ?, शिंदेंचा पलटवार

August 1, 2015 7:16 PM0 commentsViews:

shinde on rajnath singh01 ऑगस्ट : संसदेत मी हिंदू टेरर हा शब्दप्रयोग कधीही केलेला नाही असा खुलासा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केलाय. तसंच.गुरदासपूर हल्ल्यानंतरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना हिंदू टेररची आठवण झाली का ?, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

पुण्यात रंगत संगत प्रतिष्ठाणच्या वतीने गझलकार रमण रणदिवे यांच्या सत्कार समारंभ सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिंदेंनी मोदी सरकारवर टीका केली. युपीएनेच हिंदू टेरर हा शब्द जन्माला घातला आणि त्यामुळेच देशात दहशतवाद वाढला असा आरोप काल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी केला होता. त्यावर शिंदेंनी राजनाथ सिंहांचा आरोप फेटाळून लावले.

हिंदू टेरर हा शब्द मी कधी संसदेत उच्चारला नाही. जयपूरच्या अधिवेशनात हा शब्द वापरला पण लगेच मागे घेतला होता असा खुलासा शिंदेंनी केला. तसंच मुळात एनडीए सरकार निष्क्रीय आहे. म्हणून दहशदवादी कारवाया वाढल्या आहे. याकूब मेमनच्या फाशीला जाहीर स्वरूप द्यायची गरज नव्हती. आज फोन करून धमक्या द्यायची हिंमत वाढली असा सणसणीत टोला शिंदेंना लगावला.

तसंच गुरदासपूर हल्ल्यानंतर हिंदू टेरर मोदी सरकारला आठवलाय. कंधार विमान अपहरण घटनेनंतर लाल किल्ला हल्ला, जम्मू काश्मीर संसद हल्ला या घटना वाढल्या याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं. एक वर्ष झाले एक टक्का पण अच्छे दिन आले नाहीत. मोदी सरकार फार काळ टिकणार नाही असंही शिंदे म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close