हिंदीच्या वापरासाठी कोर्टात जाण्याची तयारी – अबू आझमी

December 10, 2009 12:03 PM0 commentsViews: 5

10 डिसेंबर विधानसभेत हिंदीचा वापर करण्यासाठी परवानगी दिली नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिला आहे. आझमी यांनी पुन्हा एकदा हिंदीचा मुद्दा लावून धरला आहे. विधानसभेच्या कामकाजात हिंदीचा वापर करावा अशी मागणी करणारे पत्र त्यांनी विधानसभा सचिवांना पाठवलं होतं. विधानसभेत मराठीला अग्रक्रम दिला पाहीजे मात्र मराठी नंतर इंग्रजी ऐवजी हिंदी भाषा वापरण्याची मागणी त्यांनी विधानसभा सचिवांना केली आहे.

close