जॅकेटची खरेदीसंदर्भात मुंबई हायकोर्टाने मागितलं सरकारकडे उत्तर

December 10, 2009 12:08 PM0 commentsViews: 3

10 डिसेंबर शहीद हेमंत करकरे यांच बुलेटप्रुफ जॅकेट कुठून खरेदी केलं. ते वापरापूर्वी टेस्ट केलं होतं का ? यासंदर्भात राज्य सरकारला हायकोर्टात उत्तर द्यावं लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांचा कालवधी दिला आहे. गहाळ झालेल्या बुलेटप्रुफ जॅकेटप्रकरणी संतोष दौंडकर यांनी माझगाव कोर्टासह मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल केली होती. संबंधित जॅकेट हे निकृष्ट दर्जाचं होतं असा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला होता. याच याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

close