विधानसभा उपाध्यक्षपद निवडणुकीतून सेनेची माघार

December 10, 2009 12:13 PM0 commentsViews: 3

10 डिसेंबर विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या सूर्यकांत दळवींनी माघार घेतली. त्यामुळे आता विधानसभेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांची निवड निश्चित झाली आहे. युतीने बुधवारी दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्ष पद विरोधकांकडे द्यायचा संकेत असतो. पण राष्ट्रवादीला अध्यक्षपद दिल्यानंतरही आघाडीने आणि विशेषत: काँग्रेसने या पदावरचा दावा सोडलेला नव्हता. काँग्रेसचे मधुकर चव्हाण, संजय देवतळेयांची या पदासाठी चर्चा सुरू होती. अखेर विलासराव गटाचे मानले जाणारे मधुकर चव्हाण ही उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले. मधुकर चव्हाण तुळजापूर मतदारसंघातून सतत 4 वेळा निवडून आले आहेत. ते श्री तुळजापूर देवस्थानचे विश्वस्त आहेत. चव्हाण मंत्रीपदासाठी इच्छुक होते. उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. पण आता चव्हाणांमुळे जिल्ह्याला लाल दिवा मिळणार आहे.

close