शाहरुख खानवरील वानखेडे बंदी मागे

August 2, 2015 5:29 PM0 commentsViews:

shahrukj aerr

02 ऑगस्ट : सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याने वानखेडे स्टेडियमवर अभिनेता शाहरुख खानला घातलेली पाच वर्षांची प्रवेशबंदी उठवण्यात आली आहे. आज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘आयपीएल’च्या कोलकाता नाईट रायडर्सचा मालक असलेल्या शाहरूखने 2012मध्ये वानखेडे स्टेडियमवर एका सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केली होती. सुरक्षारक्षक नियमांच्या चौकटीत राहून आपली ड्युटी करत असताना शाहरुखने क्षुल्लक कारणावरून त्याला धक्काबुक्की केली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुखवर स्टेडियममध्ये येण्यास पाच वर्षांची बंदी घातली. ही बंदी 2017 मध्ये संपणार होती. दरम्यान, बंदी घातल्यानंतर गेल्या तीन वर्षांत त्याने कधीही वानखेडेवर प्रवेशासाठी जबरदस्ती केली नव्हती.

शाहरूख खानवरील बंदीचा निर्णय दुदैवी होता. त्याच्यावरील बंदी उठविण्याबाबतचा प्रस्ताव आपण सादर केला आणि तो सर्वानुमते संमत करण्यात आल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोशिएशनचे पदाधिकारी आशिष शेलार यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close