पर्ससीनवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर

August 2, 2015 9:37 PM0 commentsViews:

02 ऑगस्ट : सिंधुदुर्गातल्या पारंपरिक आणि पर्ससीन मच्छिमारांमधल्या संघर्षावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे किनार्‍यापासून जवळ घुसखोरी करून बेसुमार मच्छिमारी करणार्‍या परराज्यातल्या ट्रॉलर्सना पकडण्यासाठी आता चक्क ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय पारंपारीक मासेमारांनी घेतला आहे.

मासेमारी बंदी कालावधी संपला असून नवा हंगाम सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर विनापरवाना पर्ससीन आणि परप्रांतीय हायस्पीड ट्रोलर्सचा धुमाकूळ गेली दोन ते तीन वर्षे सुरु आहे. यामुळे पारंपारिक मच्छिमार आणि पर्ससीन मच्छिमारांत अनेकवेळा संघर्ष पेटला आहे. या पर्ससीन मासेमारांवर चाप लावण्यासाठी पारंपारीक मासेमारांनी आता ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्रात सुरू असलेल्या मासेमारीवर लक्ष ठेवणारी अत्याधुनिक कॅमेरा असलेला ड्रोन पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने घेण्यात आली आहे. यात त्या ड्रोनच्या क्षमतेनुसार काही किमी क्षेत्रावर नजर ठेवता येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close