आसाम मध्ये बाँम्बस्फोट : चार जण मृत्युमूखी

December 10, 2009 12:23 PM0 commentsViews: 4

10 डिसेंबर आसाममध्ये गुरूवारी सोनितपूर जिल्ह्यात बॉम्बस्फोट झाला. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. मिसामरी पोलीस स्टेशनजवळच्या बाजारात हा स्फोट झाला. स्वतंत्र बोडोलँडची मागणी करणार्‍या नॅशनल डेमोक्रॅटीक फ्रंट ऑफ बोडोलँडनं हा स्फोट घडवल्याचा संशय आहे. जखमींना तेजापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.

close