आता बुलंद तसबीरीत जाणार हमारा बजाज

December 10, 2009 12:25 PM0 commentsViews: 15

10 डिसेंबरये जमीं, ये आसमाँ, हमारा कल- हमारा आज… बुलंद भारत कि बुलंद तसबीर हमारा बजाज… या जाहीरातीमधील गाण्याने घरोघर पोहचलेली बजाज स्कूटर आता बंद होणार आहे. बजाज कंपनीनं स्कूटरची निर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षअखेरपर्यंत बजाज स्कूटर उद्योगातून पूर्णपणे बाहेर पडेल. बजाज चेतकमुळे फेमस झालेली ही कंपनी सध्या फक्त एक गेयरलेस स्कूटर तयार करत आहे. येत्या काही दिवसात आता कंपनी आपलं लक्ष संपूर्णपणे मोटरसायकल बिझनेसवर केंद्रीत करणार आहे. सध्या हिरो होंडा या मोटरसायकल सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे.

close