औरंगाबादमध्ये शिवसेनेत बंडखोरी

December 10, 2009 1:07 PM0 commentsViews: 2

10 डिसेंबरऔरंगाबादमध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 13 सदस्यांनी शिवसेनेचे कार्यकारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे सादर केलेत. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे मनमानी कारभार करत असल्याची तक्रार या सदस्यांनी केली आहे. हे तेराही सदस्य थेट जिल्हाधिकार्‍यांकडे राजीनामे देणार होते. मात्र वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी मन वळविल्यामुळे त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठविले आहेत. विधानसभा निवडणुकीतही पक्षाने तिकिट नाकारल्याने प्रदीप जयस्वाल यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला होता.

close